पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देणारा सापडला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ एप्रिल । पुण्यातील विविध पक्षाच्या नेत्यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली होती. खंडणीसाठी ही धमकी आली होती आणि ही धमकी एका तरुणीच्या नावाने देण्यात आली होती, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं होतं. भाजप आमदार महेश लांडगे, मनसे नेते वसंत मोरे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे या तिघांना खंडणीसाठी फोनवर धमकी देण्यात आली होती. या तिघांनीही पोलिसांकडे सदर प्रकरणात तक्रार केली होती.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सदर प्रकरणाचा तपास केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला यापूर्वी वसंत मोरे यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, मात्र जामिनावर सुटल्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. इम्रान शेख असं आरोपीचं नाव असून पोलिसांना सदर प्रकरणाच्या तपासादरम्यान एख धक्कादायक बाब कळाली आहे. इम्रान शेख हा एक विवाहनोंदणी संकेतस्थळ चालवत होता. हे काम करत असताना त्याला एक तरुणी आवडली होती. या तरुणीला त्याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने लग्नाला नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या इम्रान याने ही तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना अडकवण्याचा कट रचला होता.

इम्रान पुण्यातील राजकीय नेत्यांना या तरुणीच्या नावाने फोन करून धमकावत होता. खंडणीची रक्कम ठेवण्यासाठी तो तरुणीच्याच गाडीचा नंबर देत होता असं पोलिसांना कळालं आहे. हे सगळं त्याने तरुणीला त्रास देण्यासाठी केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *