महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ एप्रिल । जागतिक बाजारपेठेतील स्थिती सध्या म्हणावी तेवढी चांगली नाही. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्याकडे वळत आहेत. सोन्याची मागणी देखील वाढली आहे. दुसरीकडे प्रत्येक दिवशी सोनं वाढतच चाललं आहे. सोन्याने नवीन रेकॉर्ड केला आहे.याच दरम्यान तुम्ही जर दर वाढतात म्हणून सोनं घेत नसाल तर अशी चूक करू नका. कारण अक्षय्य तृतीया आणि त्यानंतर सोनं आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोनं 65 ते 68 हजार रुपयांवर जाईल असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही जर आता सोनं घेतलं तर तुम्ही फायद्यामध्ये राहाल.
भारतात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मार्चनंतर एप्रिल महिन्यात सोने दररोज नवनवीन विक्रम करत आहे. 6 एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 61 हजारांच्या पुढे गेला होता.
दुसरीकडे, जर आपण एमसीएक्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 60 हजारांच्या वर गेल्या आहेत. मार्चनंतर एप्रिल महिन्यात सोन्याचे भाव ज्या प्रकारे गगनाला भिडत आहेत, ते पाहता धनत्रयोदशी आणि दीपावलीपर्यंत सोन्याचा भाव ६५ हजारांच्या पुढे जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.