देशभरात चोवीस तासांत कोरोनाने 265 लोकांचा बळी ; जवळपास ८,००० नव्या रुग्णांची भर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – पुणे : देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या चोवीस तासांत 7 हजार 964 ने वाढ झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. रुग्णवाढीचा एका दिवसातला हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. चोवीस तासांत कोरोनाने 265 लोकांचा बळी घेतला असल्याचेही सांगण्यात आले.

देशभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 73 हजार 763 वर पोहोचली आहे. मृतांची संख्या 4 हजार 971 वर गेली आहे. रुग्णांपैकी 82 हजार 369 जणांवर यशस्वीपणे उपचार झाले आहेत, तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 86 हजार 422 इतकी आहे.

कोरोनाचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील रुग्णसंख्या 62 हजार 228 वर पोहोचली आहे. मृतांची संख्या 2 हजार 98 वर गेली आहे. महाराष्ट्राखालोखाल तामिळनाडूचा क्रमांक लागतो. या राज्यातील रुग्णसंख्या 20 हजार 246 वर गेली आहे. दिल्लीत कोरोनाचे 17 हजार 386 रुग्ण आहेत. मृतांची संख्या 398 वर गेली आहे. गुजरातमध्ये रुग्णसंख्या 15 हजार 934, तर मृतांची संख्या 980 आहे. राजस्थानमध्ये 8,365 इतके रुग्ण आहेत. मृतांची संख्या 184 आहे. मध्य प्रदेशात 7,645 रुग्ण आहेत. आतापर्यंत 334 जण मरण पावले आहेत. उत्तर प्रदेशात रुग्णांची संख्या 7,284 आहे. 198 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *