Ajit Pawar Not reachable: “नॉट रिचेबल नव्हतो तर…”; अजित पवारांनी केला खुलासा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ एप्रिल । राज्यात विरोधीपक्ष नेते अजित पवार नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान, त्यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्यासह पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान अजित पवार सहपत्निक थेट पुण्यात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.(Ajit Pawar Not Reachable update Pune Present at the opening of the jewellery maharashtra politics)

अजित पवार आणि ७ आमदार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंड केलं होतं. अशाच प्रकारचं बंड तर नव्हे ना, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.

दरम्यान, काल दुपारी २ पर्यंत बारामतीला होते. त्यानंतर दोन कार्यक्रमासाठी ते कोरेगाव पार्कमध्ये पोहचले. पण त्यांनी त्यांचे कार्यक्रम रद्द केले. निकटवर्तीयांनी माहिती दिल्यानुसार दोन कारणं समोर आली आहेत. अचानक त्यांना मुंबईमधून फोन आला. तसेच दुसर कारण म्हणजे, त्यांची तब्येत बिघडल्यामुळं पुढचे कार्यक्रम रद्द केले. म्हणजे पवार पुण्यातच होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *