वीज बिल वाचवण्यासाठी पुणे मेट्रोचा अनोखा प्रयोग ; बचत होणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । जगभरात अनेक शहरांमध्ये मेट्रो स्टेशन आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार होत आहे. पुणे शहरातील मेट्रोचे काम पूर्णत्त्वासही आले आहे. काही मार्ग सुरु झाले आहे. पुणे मेट्रोने वीज बचतीसाठी अनोखा फंडा शोधला आहे. यामुळे पुणे मेट्रोची दर महिन्याला लाखो रुपयांची बचत होणार आहे. पुणे मेट्रोच्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भार कमी होणार आहे. पुणेकरांना वाहतुकीचा पर्याय देताना विजेसाठी पर्याय पुणे मेट्रोने तयार केला आहे.

काय करणार पुणे मेट्रो
सौर उर्जेचा मेट्रो प्रशासनाचा भर दिला आहे. पुणे शहरातील मेट्रो स्थानकावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे. यामुळे पुणे मेट्रो स्टेशन सौर ऊर्जा निर्मितीची केंद्रेच बनणार आहे. पुणे शहरातील एकूण 23 मेट्रो स्टेशनवर सौर पॅनल बसवण्यात येणार आहे. यामाध्यमातून पुणे मेट्रो दररोज 9 मेगावॉट विजेची निर्मिती करणार आहे. विज बिल वाचवण्यासाठी पुणे मेट्रोने हे पाऊल उचलले आहे. यामुळेच पुणे मेट्रोकडे देशातल्या अनेक राज्यांचे लक्ष लागले आहे.

पुणे आणि परिसरात दुसऱ्या टप्प्यात ८२.२ किमीचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी शहरातल्या ८ वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रोसह लाइट मेट्रो आणि मोनोरेल प्रकल्प राबवण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे. महामेट्रोकडून यासंदर्भातला सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च केंद्र आणि राज्य सरकारनं प्रत्येकी ५० टक्के करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याला पुढच्या आठवड्यात निर्णय होणार आहे.

तिसरा प्रकल्प
हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती हबशी जोडणारा पुणे मेट्रो लाइन 3 प्रकल्प मार्च 2025पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. टाटा प्रकल्प टप्प्याटप्प्याने काम करण्याऐवजी संपूर्ण 23 किमी लांबीच्या मेट्रोचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) आणि टाटा प्रोजेक्ट्स या दोन्ही मेट्रो लाइन्स इंटिग्रेटेड आहेत आणि त्या एकमेकांना पुरक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *