महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । Top 10 Cars in March: मार्च महिन्यातील कारच्या विक्रीचे आकडे आपल्यासमोर आले आहेत. कार उत्पादकांसाठी हा महिना चांगला आहे आणि बहुतेक कंपन्यांनी सकारात्मक वाढ नोंदवली आहे. मात्र, टॉप १० कारच्या यादीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. उर्वरित महिन्यांप्रमाणे, मार्च २०२३ मध्ये देखील, १० पैकी ७ सर्वाधिक विक्री झालेल्या कार मारुती सुझुकीच्या होत्या. मारुतीच्या लोकप्रिय हॅचबॅकने गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. बलेनो, अल्टो आणि वॅगनआर सारख्या मॉडेल्सना मागे टाकले. मार्चमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० कारची यादी पाहूया.
Swift ने मारली बाजी
मारुती सुझुकी स्विफ्ट ही गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. मार्च २०२३ मध्ये १७,५५९ युनिट्सची विक्री झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी वॅगनआर होती, ज्यांच्या १७,३०५ युनिट्सची विक्री झाली.
Brezza ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही
फेब्रुवारी महिन्याप्रमाणे, मार्चमध्येही मारुती सुझुकी ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. मार्च २०२३ मध्ये या कारच्या १६,२२७ युनिट्सची विक्री झाली आहे. ब्रेझानंतर कंपनीची मारुती सुझुकी बलेनो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची १६,१६८ युनिट्स विकली गेली.
Nexon-Creta चा कमाल
गेल्या महिन्यात टाटा नेक्सॉन पाचव्या तर ह्युंदाई क्रेटा सहाव्या क्रमांकावर होती. या दोन्ही SUV ने मार्च २०२३ मध्ये अनुक्रमे १४,७६९ आणि १४,०२६ युनिट्स विकल्या आहेत.
Maruti Dzire एकमेव सेडानची बाजी
मारुती सुझुकी डिझायर ही टॉप १० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये एकमेव सेडान कार आहे. गेल्या महिन्यात या कारच्या १३,३९४ युनिट्सची विक्री झाली होती. मारुती सुझुकी Eeco आठव्या क्रमांकावर आहे, ज्याने गेल्या महिन्यात ११,९९५ युनिट्सची विक्री केली आहे.
पंच आणि ग्रँड विटारा यांचाही टॉप 10 मध्ये समावेश
टाटा पंच टॉप १० यादीत कायम आहे. मार्चमध्ये ते नवव्या स्थानावर आहे. १०,८९४ युनिट्सची विक्री नोंदवली. ग्रँड विटाराने प्रथमच टॉप १० मध्ये प्रवेश केला आणि गेल्या महिन्यात १०,०४५ युनिट्सची विक्री केली.
मार्चमधील टॉप 10 कारची यादी
मारुती सुझुकी स्विफ्ट – १७,५५९ युनिट्स
मारुती सुझुकी वॅगनआर – १७,३०५ युनिट्स
मारुती सुझुकी ब्रेझा – १६,२२७ युनिट्स
मारुती सुझुकी बलेनो – १६,१६८ युनिट्स
टाटा नेक्सॉन – १४,७६९ युनिट्स
ह्युंदाई क्रेटा – १४,०२६ युनिट्स
मारुती सुझुकी डिझायर – १३,३९४ युनिट्स
मारुती सुझुकी Eeco – ११,९९५ युनिट्स
टाटा पंच – १०,८९४ युनिट्स
मारुती सुझुकी ग्रँड विटारा – १०,०४५ युनिट्स