यंदा नक्की कोणता ITR फॉर्म भरायचा समजत नाहीये? जाणून घ्या सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । नवीन आर्थिक वर्ष म्हणजे २०२३-२४ ची सुरुवात झाली आहे आणि आता करदात्यांना वेध लागलंय ते म्हणजे आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याचे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) करदात्यांसाठी एक महिना अगोदर नवीन ITR फॉर्म जारी केले होते. तर यंदाच्या अर्थसंकल्पातही नवीन कर व्यवस्थेत अनेक सुविधाही उपलब्ध करून दिल्या. दरम्यान, आयकर रिटर्न भरताना फॉर्मबद्दल गोंधळ होऊ शकतो, अशा स्थितीत आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत आणि तुमच्यासाठी कोणता आयटीआर फॉर्म योग्य, हे इथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जर तुमच्याकडे २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या आयकर फॉर्मची माहिती असेल तर तुम्ही सहजपणे आयकर रिटर्न भरू शकाता.

आयटीआर-1
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ५० लाखांपर्यंत आहे तर तुमच्यासाठी ITR-1 फॉर्मचा पर्याय आहे. यामध्ये तुमचे वार्षिक उत्पन्न पगार, कौटुंबिक निवृत्ती वेतन, निवासी मालमत्ता इत्यादींमधून असले पाहिजे. तसेच शेतीचे उत्पन्न ५००० रुपयांपर्यंत असले तरी ITR-1 फॉर्म भरावा लागतो. मात्र, तुम्ही एखाद्या कंपनीत संचालक असाल किंवा असूचीबद्ध कंपनीत शेअर्स असल्यास तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. त्याच वेळी, लॉटरी किंवा रेस कोर्समधून मिळणारे उत्पन्न देखील या श्रेणीत येत नाही.

आयटीआर-2
ITR-2 फॉर्म व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी लागू आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त आहे तसेच त्यांना कोणत्याही व्यवसायातून नफा मिळत नाहीत. यामध्ये एकापेक्षा जास्त निवासी मालमत्ता, गुंतवणुकीवरील भांडवली नफा किंवा तोटा, १० लाख रुपयांपेक्षा जास्त लाभांश आणि ५ हजार रुपयांपेक्षा जास्त कृषी उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. तसेच भविष्य निर्वाह निधी व्याज मिळत असल्यासही हा फॉर्म भरावा लागेल.

आयटीआर-3
ती व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब जे कोणत्याही व्यवसायातून नफा मिळवत आहेत, त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. यामध्ये ITR-1 आणि ITR-2 मध्ये दिलेल्या सर्व उत्पन्न श्रेणींची माहिती द्यावी लागेल. जर एखादी व्यक्ती एखाद्या फर्ममध्ये भागीदार असेल तर त्याला वेगळा ITR फॉर्म भरावा लागेल. तसेच शेअर्स किंवा मालमत्तेच्या विक्रीतून भांडवली नफा किंवा व्याज किंवा लाभांशातून मिळकत असली तरीही तोच फॉर्म भरावा लागेल.

आयटीआर-4
आयटीआर-४ फॉर्म म्हणजेच सुगम फॉर्म व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब आणि LLPs व्यतिरिक्त इतर कंपन्यांसाठी असतो, ज्यांचे एकूण उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त आहे आणि ते अशा स्रोतांमधून कमावत आहेत जे ४४AD, ४४ADA किंवा ४४AE सारख्या कलमांच्या कक्षेत येतात. तसेच जर तुम्ही कोणत्याही कंपनीत संचालक आहात किंवा इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात किंवा शेतीतून ५००० रुपयांपेक्षा जास्त कमावतात असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही.

आयटीआर-5
LLP कंपन्या, व्यक्तींची संघटना, व्यक्तींची संस्था, कृत्रिम न्यायिक व्यक्ती, सहकारी संस्था आणि स्थानिक प्राधिकरणाने आयटीआर भरताना हा फॉर्म भरायचा.

आयटीआर-6
यांनी कलम ११ अंतर्गत कर सूटचा दावा केला नसलेल्या कंपन्यांसाठी हा फॉर्म आहे. कलम ११ अन्वये, अशा प्रकारचे उत्पन्न करातून मुक्त आहे, जे कोणत्याही धर्मादाय किंवा धर्मादाय कार्यासाठी ट्रस्टकडे ठेवलेल्या मालमत्तेतून मिळवले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *