महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ एप्रिल । वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर खोल प्रभाव पडतो. प्रत्येक लहानसहान घटनेमागे वास्तुचे योगदान असते. यामुळेच अनेक लोक आपल्या घरापासून ते ऑफिसपर्यंत आणि त्यांच्या खाजगी आयुष्यातही वास्तुदोष होणार नाही ना याची विशेष काळजी घेतात.
वास्तुशास्त्रात लिहून ठेवलेल्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. बंद पडलेली कामं मार्गी लागतात, प्रकृतीच्या समस्येपासून सुटका होते, आर्थिक परिस्थिती सुधारते, मनातल्या इच्छा पूर्ण होतात. पण याच उलट जर आपण त्या गोष्टी पाळल्या नाही तर आपल्याला त्याचे भरपूर दुष्परिणाम भोगावे लागतात.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचं एक वेगळं महत्व आहे आणि त्या त्या दिशेच्या प्रकृतीनुसार तिला एक विशिष्ट रंग नियोजित करुन ठेवला आहे. दक्षिण दिशा लाल रंगाशी संबंधित आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला लाल रंगाचा संगमरवरी फरशी वापरणे तुमच्यासाठी चांगले ठरेल.
पण आजकाल संगमरवरी दगड काही परवडणारी गोष्ट नाही अशात तुम्ही टाईल्स त्या रंगाच्या वापरु शकतात. पण जर कोणाला हा रंग आवडत नसेल किंवा लाल रंगाचा फ्लोअर नको असेल तर यावरही उपाय आहे.
संपूर्ण फरशीवर लाल रंग वापरण्याऐवजी, त्या टाईल्सला लाल रंगाची ठिपके किंवा फुले किंवा अशी काही डिझाईन असेल याची तुम्ही काळजी घेऊ शकतात.
शिवाय, दक्षिण दिशेला लाल रंगाची फरशी बसवण्याऐवजी तुम्ही तिथे लाल रंगाचा डिझाईन असलेला गालिचाही आंथरु शकतात.
नक्की काय फायदा होईल?
१. पैशाच्या समस्या दूर होतील.
२. घरात जर कटकट भांडण होत असतील तर ते दूर होईल.
३. कुटुंबाची मानसिक स्थिती सुधारेल.
४. मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल.
५. कधीही कोणतीही कमी भासणार नाही.