Realme Narzo N55 स्मार्टफोन लाँच, जबरदस्त कॅमेरा आणि किंमत फक्त…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ एप्रिल । गेल्या काही दिवसांपासून मोबाईलप्रेमींची असलेली प्रतीक्षा संपलेली आहे. रियलमी नार्झो एन 55 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असून दोन स्टोरेज ऑप्शनसह आहे. यात 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट आहे. कंपनीने 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच केला आहे. MediaTek Helio G88 SoC सह कंपनीचा हा पहिला N सीरीज Narzo स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन 18 एप्रिलपासून Realme ची वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर विकत घेऊ शकता. चला जाणून या स्मार्टफोनच्या कॅमेरा, बॅटरी, प्रोसेसर आणि किमतीबाबत…

Realme Narzo N55 कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा एआय प्रायमरी कॅमेरा आहे. या व्यतिरिक्त 2 एमपीचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी स्क्रिन आहे. ही स्क्रिन 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोनचं रेझ्युलेशन 1080*2400 पिक्सल आहे. 680 निट्स ब्राइटनेससह येतो.

Realme Narzo N55 परफॉर्मन्स
रियलमी नार्झो स्मार्टफोनमधेय 5000 एमएएच बॅटरी आहे. ही बॅटरी 33 व्हॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 13 वर आधारीत यूआय 4.0 वर चालतो.

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेट दिली आहे. मायक्रो एसडी कार्डसह स्टोरेज टीबीपर्यंत वाढवू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये ड्युअल बँड वायफाय, 4G LTE, ब्लूटूथ, जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्स सह येते.

Realme Narzo N55 किंमत
नार्झोची एन55 ची किंमत 4 जीबी आणि 64 जीबी व्हेरियंटसाठई 10,999 रुपये आहे. दुसरीकडे 6 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 12,999 रुपये आहे. या दोन्ही स्मार्टफोनवर 1000 रुपयांपर्यंत स्पेशल ऑफर दिली जात आहे.एचडीएफसी आणि एसबीआय बँक कार्डने पेमेंट केल्यास ही ऑफर मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *