8 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार देणार खुशखबर ! पगार वाढीबाबत मोठी अपडेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ एप्रिल । केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही आठव्या वेतन आयोगाचा उल्लेख संसदेत केला होता. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पुढील महागाई भत्ता १ जुलैपासून लागू होणार आहे. पण, याअगोदर मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे.

कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होऊ शकते. तर दुसरीकडे ८ वा वेतन आयोग येणार नसल्याचीही चर्चा आहे.८ व्या वेतन आयोगादरम्यान कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.


केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही आठव्या वेतन आयोगाचा उल्लेख संसदेत केला होता. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. मागील वेतन आयोगाच्या तुलनेत त्याची गणना केली जाईल.चौथ्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २७.६% वाढ झाली होती. यामध्ये किमान वेतन ७५० रुपये निश्चित करण्यात आले. पाचव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात ३१ टक्क्यांची मोठी वाढ झाली होती. त्यामुळे त्यांचे किमान वेतन दरमहा २५५० रुपये झाले.

सहाव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८६ पट ठेवण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात ५४ टक्के वाढ झाली असून मूळ वेतन ७ हजार रुपये झाले आहे.सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरला आधार मानून २.५७ पट वाढ झाली. किमान मूळ वेतन १८,००० रुपये झाले आहे. कर्मचारी आता फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. पण ते २.५७ पटीने कायम आहे.८ व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर आधार म्हणून ठेवला जाऊ शकतो. या आधारावर कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर ३.६८ पटीने वाढवले ​​जाऊ शकते. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात ४४.४४ टक्के वाढ होऊ शकते. कर्मचार्‍यांचे किमान वेतन २६,००० रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *