Jaggery Benefits: उन्हाळ्यात गूळ खावा का? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ एप्रिल । पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा गुळाचा जास्त वापर केला जात होता. खरंतर साखर आणि गुळ दोन्ही उसापासून तयार केले जातात. मात्र, गूळ साखरेच्या तुलनेने आरोग्यास फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळ आपण खातोच मात्र उन्हाळ्यात गुळामुळे आरोग्याचे नुकसान होते अशी समज आहे. मात्र तज्ज्ञांच्य मते उन्हाळ्यात गुळाचे योग्य सेवन केल्यास आरोग्याला खूप फायदेशीर ठरते. यामध्ये लोह, खनिजे, जीवनसत्त्वे आढळतात तसेच त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. भारतीय संस्कृतीत घरी येणाऱ्याला विशेषतः उन्हातून आल्यास गूळ आणि पाणी देण्याची प्रथा आहे. गुळाचे आरोग्याला असणारे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. जाणून घेऊया गुळ खाण्याचे विविध फायदे

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी मदत
दुपारच्या जेवणानंतर गुळाचा तुकडा खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून बराच आराम मिळतो. गूळ उन्हाळ्यात पचनसंस्था सुधारण्यास मदत करतो. गुळात अनेक पाचक तत्व आढळतात, ते पोटाला आराम देण्याचे काम करतात.


आरोग्यास फायदेशीर
गुळाचा चहा तयार करून सकाळसंध्याकाळ प्यायल्यास सर्दी, खोकला, ताप यासाठी आराम मिळतो. अशा प्रकारे गूळ खाल्ल्यास आरोग्यास फायदा होतो.

शरीर थंड राहते
गूळ शरीराला थंड ठेवण्याचेही काम करतो. ते खाण्यासाठी भांड्यात गूळ घ्या, वितळण्यासाठी 2 तास ठेवा नंतर त्यात तुळस, लिंबाचा रस घाला आणि ते एकत्र करून प्यावे. यामुळे उष्माघात टाळण्यास मदत होते आणि शरीर थंड राहते.

शरीराला ऊर्जा मिळते
गूळ शरीराला ऊर्जा देण्याचेही काम करतो. जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल तर गुळाचा तुकडा खावा यामुळे आराम मिळतो.

सर्दीवरही गुणकारी
सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.

आवाज चांगला राहतो –
गूळ आणि आलं गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते. त्यामुळे आवाज बसत नाही.

हेही वाचा – उन्हाळ्यात तुम्हीही गरमा गरम जेवण जेवताय? थांबा! आधी तोटे जाणून घ्या

कोणताही पदार्थ प्रमाणात खावा. त्यामुळे गूळदेखील प्रमाणात खावा. गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्त दुषित होऊन अंगावर फोडं येण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना त्वचारोग आहे त्यांनी गूळ खाणे टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *