![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ एप्रिल । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सातत्याने तेजी दिसून येत आहे. अक्षय्य तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीकडे लोकांचा कल आहे त्यामुळे सोने चांदीच्या दरात वाढ होताना दिसतेय. तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल तर आजचा दिवस उत्तम आहे कारण आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,940 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,030 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 785 रूपये आहे. (Gold Silver Price update 17 April 2023)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
पुणे – 61,030 रुपये
मुंबई – 61,030 रुपये
नागपूर – 61,030 रुपये
चेन्नई – 61,640 रुपये
दिल्ली – 61,180 रुपये
हैदराबाद – 61,030 रुपये
कोलकत्ता – 61,030 रुपये
लखनऊ – 61,180 रुपये
