महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । UP Police Against Mafia : उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी अतीक अहमद त्याचा मुलगा असद आणि भाऊ अशरफ यांच्या खात्म्यानंतर योगी सरकार आता उत्तर प्रदेशातून सर्वच माफिया राज संपवण्याच्या बेतात आहे, असे दिसते. माफिया अतिक नंतर तब्बल 61 गँगस्टर योगी सरकारच्या रडारवर आहेत. युपी पोलिसांनी या गँगस्टर्सची लिस्ट तयार केली आहे. एका हिंदी वेबचॅनलने याचे वृत्त दिले आहे.
वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, या सर्व गँगस्टर विरोधात लवकरच मोठी करवाई सुरू केली जाणार आहे. तसेच या माफियांची 500 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची देखील योजना बनवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या यादीत दारू माफिया, अवैध खनन, वन आणि पशू माफिया याशिवाय शिक्षा माफिया यांचाही समावेश आहे. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मंजुरी मिळताच कारवाईला सुरुवात होणार आहे. माफियांविरोधात मोठे अभियान चालवले जाणार आहे. एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणतात की, राज्यातील गुन्हेगारांचे जाळे संपवण्यासाठी व्यापक मोहीम राबवली जाईल.
पोलिसांनी 61 गँगस्टरची यादी तयार केली आहे. त्यामध्ये काही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांची नावे देखील आहेत. त्यात पूर्व विधायक मुख्तार अंसारी, बृजेश सिंह, पश्चिमी यूपीतील गैंगस्टर ऊधम सिंह, सुनील राठी, सूंदर भाटी, सुभाष ठाकूर, राजन तिवारी गुड्डू सिंह, सुधाकर सिंह बहराइचचे गब्बर सिंह, बदान सिंह, अजीत चौधरी अक्कू, धर्मेंद्र किरथल, अभिषेक सिंह हनी, निहाल पासी, राजन तिवारी, सुधीर कुमार सिंह, विनोद उपाध्याय इत्यादींची नावे आहेत.
लिस्टमध्ये सपा आणि बसपाशी संबंधित माफियांच्या नावाचाही समावेश आहे. यामध्ये बच्चू यादव, जुगनू वालिया, रिजवान जहीर, दिलीप मिश्रा, अनुपम दुबे, हाजी इकबाल आणि लल्लू यादव यांची नावे आहेत. इतकेच नव्हे तर त्रिभुवन सिंह, खान मुबारक, सलीम, सोहराब, रुस्तम, बबलू श्रीवास्तव, वलूमेश राय, कुंटू सिंह, सुभाष ठाकूर, संजीव माहेश्वरी जीवा आणि मुनीर सारख्या माफियांची नावेही या यादीत आहे.
माफिया सुंदर भाटी हे पोलिसांचे पुढील टार्गेट असू शकते. दिलेल्या माहितीनुसार, भाटीचे नाव अतीक-अशरफ हत्याकांडात पुढे आले होते. सुंदर भाटी हा ग्रेटर नॉयडाचा राहणारा असून त्यावर तब्बल 62 गुन्हे दाखल आहेत. तो उत्तर प्रदेशच्या प्रश्चिम भागातील मोठा गँगस्टर आहे.
हरेंद्र प्रधान खून प्रकरणात गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयाने त्याला नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सुंदर सध्या सोनभद्र तुरुंगात आहे. अतिक आणि अशरफच्या 3 मारेकऱ्यांपैकी एक सनी मूळचा कासगंजचा रहिवासी आहे. तो सुंदर भाटी टोळीचा सदस्य आणि शार्प शूटर असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बराच काळ बांदा कारागृहात आहे. सनीने तुरुंगातच सुंदर भाटी गँगची भेट घेतली.