महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात सोमवारी झालेल्या होर्डिंग अपघातात (Accident) पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात (pimpri Chinchwad) रावेत पोलिसांनी स्वतःहून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे बेंगलोर- मुंबई हायवे लगत असलेल्या स्वामी हॉटेलजवळ एक मोठी अनधिकृत होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे खाली पडली. यामुळे पाच निष्पाप जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत शोभा विजय टाक (वय ५०), वर्षा विलास केदारी (वय ५०), रामअवध प्रलाद आत्मज (वय २९), भारती नितीन मंचल (वय ३३) आणि अनिता उमेश रॉय (वय ४५) या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर याच दुर्घटनेत तीन जण हे गंभीर जखमी झाले आहेत.
प्रकरणात आता रावेत पोलिसांनी जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे, होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे आणि जाहिरात करणारी कंपनी व इतर संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ह्या होर्डिंग दुर्घटनेतील दोषी आरोपींना अटक करण्यासाठी रावेत पोलिसांनी चार पोलिसांचे पथक तयार केले आहेत.