Pune News : पुण्यात तब्बल या 12 शाळा अनधिकृत ; तुमची मुलं या शाळांमध्ये तर नाहीत?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । पुणे जिल्ह्यात एक दोन नाही तर तब्बल 12 शाळा अनधिकृत असल्याचं उघडकीस आलं आहे. ‘झी २४ तास’नं यापूर्वीही पुण्यातील बोगस शाळांचा मुद्दा उचलून धरला होता आणि आता पुन्हा एकदा या मुद्द्यानं पालकांना आणि प्रशासनाला खडबडून जागं केलं आहे. त्यामुळं तुमची मुलंही या अनधिकृत शाळांमध्ये नाहीत ना, हे आताच पाहून घ्या.

पुण्यातील अनधिकृत शाळा
अनधिकृत शाळांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातल्या शाळांचा समावेश आहे. झी २४ तासच्या बोगस शाळांच्या बातमीनंतर कारवाई तर करत जिल्हा परिषदेनं काही पावलं उचलली, काही शाळा बंदही झाल्या पण काही मात्र अद्यापही सुरुच होत्या. त्यामुळं या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका असं आवाहन पुणे जिल्हा परिषदेनं केलं आहे.

अनधिकृत शाळांची नावं खालीलप्रमाणे…

प्रियांस फ्री प्रायमरी स्कूल कासुर्डी दौंड
केके इंटरनॅशनल स्कूल बेटवाडी दौंड
जय हिंद पब्लिक स्कूल भोसे खेड
मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल दौंड
अंकुर इंग्लिश स्कूल जांभे मुळशी
साई बालाजी पब्लिक स्कूल नेरे मुळशी
श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर पुरंदर
पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल लोणी काळभोर हवेली
कल्पवृक्ष इंग्लिश मीडियम स्कूल क्रिकेट वाडी हवेली
क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हेवाडी हवेली
किंडर गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल खडकवासला हवेली
एस एन बीपी टेक्नो स्कूल बावधन मुळशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *