मार्केट मध्ये लॉन्च झालाय ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन; १ टक्के बॅटरी असली तरी…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । Xiaomi एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले आणि अपडेट्स असे स्मार्टफोन लॉन्च करत असते. आताही कंपनीने आपला एक नवीन स्मार्टफोन बाजारामध्ये लॉन्च केला आहे. शाओमीने Xiaomi 13 Ultra हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीची नवीन फ्लॅगशिप आहे. यामध्ये कंपनीकडून अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे वापरकर्त्यांना फोन वापरताना चांगला अनुभव मिळेल. या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊयात.

Xiaomi 13 Ultra चे फीचर्स
शाओमी १३ अल्ट्रा या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७३ इंचाचा AMOLED WQHD+ डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. त्याचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका असणार आहे. तसेच पीक ब्राईटनेस हा १,३०० नीट्स इतका असणार आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित असा MIUI 14 फोन आहे. यामध्ये तुम्हला ग्राफिक्ससाठी देखील चांगले फीचर्स मिळतात. ग्राफिक्ससाठी यामध्ये Adreno 740 GPU देण्यात आले आहे.

कॅमेरा
Xiaomi 13 Ultra मध्ये Leica चा सपोर्ट असलेले चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. पहिली लेन्स ही ५० मेगापिक्सलची असून त्यात १ इंचाचा IMX989 सेन्सर आहे. इतर तीन लेन्स या ५० मेगापिक्सलच्या IMX858 सेन्सर असलेल्या आहेत. यांमध्ये ६ फोकस लेन्स आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा कॅमेरा हा फास्ट शॉट मोडसह येतो जो स्ट्रीट फोटोग्राफीसाठी डिझाईन करण्यात आला आहे. हा मोड ०.८ सेकंदात फोटो क्लीक करू शकतो असे म्हटले जात आहे.

Xiaomi 13 Ultra ची बॅटरी
Xiaomi 13 Ultra या फोनमध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि त्यासह ९०W ची वायर आणि ५०W चे वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा फोन ३४ मिनिटात वायरच्या मदतीने फुल चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. तसेच फोनला वॉटर रेसिस्टन्टसाठी IP68 रेटिंग मिळाले आहे. यामध्ये सेफ्टीसाठी इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Xiaomi 13 Ultra सह कंपनीने Hibernation मोड दिला आहे. ज्यावर असा दावा आहे की हे बॅटरीला बऱ्याच प्रमाणात ऑप्टिमाइझ करते. या मोडाच्या मदतीने १ टक्के बॅटरी शिल्लक राहिली तरी देखील फोन ६० मिनिटांसाठी वापरता येतो.

काय असणार Xiaomi 13 Ultra ची किंमत ?
Xiaomi 13 Ultra है फोन तुम्ही ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता. शाओमीच्या या फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणारयक व्हेरिएंटची किंमत ५,९९९ चिनी युआन (सुमारे ७१,६०० रुपये ) इतकी आहे. १६/५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ही ६,४९९ युआन (७७,५०० रुपये ) इतकी आहे. तर १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ७,२९९ युआन म्हणजेच (८७,००० रुपये ) इतकी आहे. सध्या कंपनीने हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन भारतात कधी लॉन्च होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *