Spice Jet कंपनीची नाशिक-दिल्ली विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद, कारण…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । स्पाइस जेट कंपनीकडून चालवली जाणारी दिल्ली – नाशिक विमानसेवा २० ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी जेट एअरवेज बंद पडल्याने पहिल्यांदा दिल्ली सेवा बंद पडली. त्यानंतर अलायन्स एअरची सेवा बंद पडली. आता स्पाईस जेटची सेवाही बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावार लागणार आहे. (nashik delhi Spice Jet flight canceled till august )

कंपनीकडे असलेल्या अनेक विमानांचे सध्या मेंटेनन्सचे काम सुरू असून चीनमधून येणारे काही स्पेअरपार्ट्स येण्यासाठी लागलेल्या उशिरामुळे हा मेंटेनन्स लांबल्याचेही सांगितले जात आहे. कारण काहीही असले तरी ही विमानसेवा बंद झाल्यामुळे नाशिकच्या नागरिकांची गैरसोय होणार हे निश्चित. यामुळे ऑगस्टपर्यंत नाशिककरांना दिल्लीला जाण्यासाठी शिर्डी विमानतळ गाठावे लागणार आहे.

तांत्रिक कारणामुळे विमार सेवा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिर्डी विमानतळावरून स्पाइस जेटचे दुपारी २.३५ आणि इंडिगोची सायंकाळी ६.०५ ला अशा दोन फ्लाइट आहेत.

तसेच मुंबई विमानतळाचा पर्याय उपलब्ध आहे. ऐन पर्यटन हंगामात ही सेवा प्रदीर्घ काळ रद्द केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून दिल्लीला जाणारे प्रवासी, उद्योजक, पर्यटक यांच्यात नाराजीचा सूर पहायला मिळत आहे.

पुरेसे प्रवासी असतानाही स्पाइस जेटकडून सेवा बंद झाल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या भूमिकेकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. ऐन पर्यटनाच्या हंगामात सेवा बंद झाल्याने ट्रॅव्हल कंपन्यांचे नियोजन ढासळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *