महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना झटका दिला आहे. कार्ती यांची INX मीडिया मनी लाँडरिंग प्रकरणात 11.04 कोटी रुपयांच्या चार मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने मंगळवारी (दि.१८) एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेल्या तीन जंगम आणि एक स्थावर मालमत्ता अशा एकूण चार मालमत्ता जप्त केल्या आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार या संपत्ती जप्त करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी. (INX media case)
INX media case: ED attaches Karti Chidambaram's four properties worth Rs 11.04 cr
Read @ANI Story | https://t.co/Yv9XxwlrdE#INX #ED #KartiChidambaram pic.twitter.com/LPMpWO7TGA
— ANI Digital (@ani_digital) April 19, 2023
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED)अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, चार संलग्न मालमत्तांपैकी एक कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे. यासोबतच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत कार्ती यांच्या विरोधात अंतरिम आदेशही जारी करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. कार्ती चिदंबरम हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र आहेत. ते तामिळनाडूमधील शिवगंगई लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार आहेत. सध्या आयएनएक्स प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांना सीबीआय आणि ईडी या दोघांनी अटक केली होती.
हे प्रकरण INX Media Pvt Ltd कडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बेकायदेशीरपणे निधी प्राप्त करण्याशी संबंधित आहे. या प्रकरणात कार्ती यांचे वडील पी. चिदंबरम यांच्या तत्कालीन UPA सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (FIPB) मान्यता मिळाली होती. कार्ती चिदंबरम हे चिनी नागरिकांना व्हिसा देण्याच्या प्रकरणातही आरोपी आहेत. 2011 मध्ये 263 चिनी नागरिकांना व्हिसा देण्यात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ईडी या प्रकरणाचाही तपास करत आहे. व्हिसा मिळवून देण्याच्या बदल्यात त्यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे.