महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । देशात विविध राज्यांत बदल होणारे नोकरशहा आहेत. त्यांच्या सोयीसाठी भारत सिरिज नंबर प्लेट लागू झाली आहे. यामुळे वारंवार वाहन नोंदणी ट्रान्सफर करण्याची गरज नाही. येथे नंबर प्लेटशी संबंधित प्रश्नांबाबत माहिती देताहेत निवृत्त आयुक्त शैलेंद्र श्रीवास्तव…
{बीएच नंबर प्लेट काेण लावू शकताेॽ भारत सीरिज नंबर प्लेट ही लषकर किंवा निमलष्करी दलात असणााऱ्यांसाठी आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारीही घेऊ शकतात. खासगी कंपनीत नोकरी करणारे लोकही ती लावू शकतात. त्यासाठी ते काम करत असणाऱ्या कंपनीचे कार्यालय चारपेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात असले पाहिजे. {सर्व वाहनांवर समान शुल्क लागेल का? नाही, बीएच सीरिज नंबर प्लेट तीन श्रेणीत विभागली आहे. १० लाख रु.पेक्षा कमी किमतीच्या वाहनांसाठी भारत सीरिज नंबर प्लेट घेण्यासाठी वाहनाच्या किमतीच्या ८% शुल्क लागेल. १० लाख ते २० लाख रुपयांदरम्यानच्या वाहनासाठी १०% पर्यंत शुल्क लागेल. २० लाखापेक्षा जास्त किंमत असल्यास बीएच मालिकेसाठी वाहनाच्या किमतीच्या १२% शुल्क लागेल. {१५ वर्षांनंतर नोंदणी नूतनीकरण करण्यासोबत बीएच क्रमांकाचे नूतनीकरण करावे लागेल का? एक नवी कार नियमित नंबर प्लेटसोबत नोंदणी करता तेव्हा तुम्हाला खरेदीदरम्यान एका वेळेस १५ वर्षांसाठी रोड टॅक्स द्यावा लागतो. हेच बीएच सीरिजमध्येही होऊ शकते. {एखाद्या नोकरदार व्यक्तीने स्थानिक बिगर बीएच पात्र व्यक्तीस वाहन विकल्यास? अशा स्थितीत खरेदीदारास आपल्या राज्यातील आरटीओकडून नंबर प्लेट घ्यावी लागेल. { बीएच नंबर घेतल्यावर काही वर्षांनी वाहनधारक निवृत्त झाल्यावर काय होईल? ही नोकरदारांसाठी दिलेली सुविधा आहे. निवृत्त व्यक्ती ज्या राज्यात राहील,त्याला त्या राज्याचा स्थानिक क्रमांक घ्यावा लागेल.