महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासनाच्या मार्फत काही दिवसांपूर्वी सदर स्ट्रॉम वॉटर लाईन ही नाल्यातील ड्रेनेज लाईनला जोडण्यात आली आहे. या चुकीच्या कामा मुळे पावसाळ्यात पुराची अतिशय गंभीर परिस्थिति निर्माण होण्याची संभावना आहे. धोकादायक बांधकाम त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी निवेदनाद्वारे ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे केली आहे .
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आकुर्डी दत्तवाड़ी भागात द्वारकामाई साई मंदिरा पासून ते आकुर्डी गावा पर्यंत मोठा नाला वाहतो या नाल्या मधून ड्रेनेज लाईन गेलेली आहे . संपूर्ण दत्तवाड़ीची अन्तर्गत ड्रेनेज लाईन या नालयातील ड्रेनेजला ठीक ठिकाणी जोडली आहे .
तसेच प्राधिकरणातील सिटी प्राईड शाळे परिसरातील पावसाचे पाणी ,लोकमान्य हॉस्पिटल परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेणारी मोठी स्टॉर्म वॉटर लाईन लोकमान्य हॉस्पिटल , साई मंदिर मागे , ठाणे जनता सहकारी बैंकेच्या मागील बाजूस गणेश मंदिर जवळील वाहणाऱ्या नाल्यात येऊन मिळते .
असे असूनही ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासनाच्या मार्फत काही दिवसांपूर्वी सदर स्ट्रॉम वॉटर लाईन ही नाल्यातील ड्रेनेज लाईनला जोडण्यात आली आहे. या चुकीच्या कामा मुळे पावसाळ्यात पुराची अतिशय गंभीर परिस्थिति निर्माण होण्याची संभावना आहे .
टेल्को-कपूर सोसायटी , माताजी सुपर मार्केट मागील परिसर , साई दर्शन नगर, मोरे वाडा , आदर्श मित्र मंडळ , जैन मंदिर , साई अपार्टमेंट , व जे. वाय. पाटील बिल्डिंग परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी तुंबुन पूर सदृश्य परिस्थिति निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच लोकमान्य हॉस्पिटल पासून येणाऱ्या स्ट्रॉम वॉटर लाईन मधील पाण्याचा प्रवाह पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात असतो . सदर स्टॉर्म वॉटर लाईन नाल्यात ड्रेनेज लाईनला जोडल्याने ड्रेनेज लाईन मधील पाण्याचा प्रवेश त्याच ठिकाणी थांबुन राहिल्याने संपूर्ण दत्तवाड़ी परिसरात पुर स्थिति निर्माण होऊ शकेल, असे निवेदनात म्हटले आहे.