महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । अक्षय्य तृतीयेला तीन दिवस बाकी असून, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ताज्या आकडेवाडीनुसार, १३ एप्रिलच्या उच्चांकावरून आज सोने १,६५१ रुपयांनी खाली आले आहे. दुसरीकडे १४ एप्रिलच्या उच्चांकावरून चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते, फेड मे महिन्यात व्याजदर वाढवू शकते. त्यामुळे डॉलरच्या निर्देशांकात वाढ होऊ शकते आणि सोने-चांदीच्या किमतीत घसरण होऊ शकते. परंतु सध्या सोने-चांदीच्या किमतीत किती वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने स्वस्त
२२ एप्रिलला अक्षय्य तृतीया असून, त्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याचा भाव ५९,७२० रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. १३ एप्रिल रोजी सोन्याचा भाव ६१,३७१ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. म्हणजेच तेव्हापासून सोन्याच्या भावात १,६५१ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा भाव ४.२० वाजता ७३२ रुपयांच्या घसरणीसह ५९,७५६ रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे.
चांदीच्या दरात मोठी घसरण
दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव पुन्हा ७५ हजारांच्या जवळपास आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे १४ एप्रिल रोजी चांदीचा भाव ७८,७९१ रुपये प्रति किलो होता. जो आज ट्रेडिंग सत्रात ७४,०५७ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला होता. याचाच अर्थ चांदी किलोमागे ३ हजारांहून अधिक रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदीचा भाव प्रति किलो १,१८५ रुपयांच्या घसरणीसह ७४१.४६ रुपयांवर आहे.