Lexus ने भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले ‘हे’ मॉडेल; ८ सेकंदात पकडणार तब्बल…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । ऑटोमोबाइल कंपनी असणाऱ्या Lexus ने भारतात आपल्या ४ जनरेशन लॉन्च केल्या आहेत. आता याच कंपनीने भारतामध्ये Lexus ने पाचवी जनरेशन लॉन्च केली आहे. हे मॉडेल २०२३ मधील ऑटो एक्स्पो मध्ये याआधीच सादर करण्यात आले होती. कारची किंमत ,फीचर्स आणि इंजिनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Lexus कंपनीने आपली नवीन जनरेशन Lexus RX हे मॉडेल दोन ऑडिओ सिस्टिमसह लॉन्च केली आहे. मार्क लेव्हिसन आणि पॅनासोनिक असे हे दोन ऑडिओ सिस्टीम आहेत. दुसऱ्या बाजूने गाडीच्या सेफ्टीबद्दल बोलायचे झाल्यास लेटेस्ट ३.० ड्रायव्हर असिस्टन्स सेफ्टी सिस्टमने सुसज्ज करण्यात आली आहे. याशिवाय डायरेक्ट ४ ड्राइव्ह फोर्स टेक्नॉलॉजी, HEV सिस्टीम आणि पॉवरफुल टर्बो हायब्रीड सारखी फीचर्स यामध्ये देण्यात आली आहेत.


Lexus RX350h 2023
Lexus RX350h 2023 या लक्झरी कारमध्ये २.५ लिटर चे ४ सिलेंडर असलेले इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन हायब्रीड ट्रान्सएक्सल अणि एक मोटरसह जोडण्यात आले आहे. हे इंजिन २४७ बीएचपी ची पॉवर निर्माण करते. ही चार चाकी कार केवळ ७.९ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग पकडते.

Lexus RX500h 2023
या कारमध्ये पॉवर देण्यासाठी २.४ लिटरचे टर्बोचार्ज केलेले इंजिन आहे. जे मागच्या चाकांतील ई-युनिटला जोडलेले आहे. आताचे RX हे सर्वात शक्तिशाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जे ३६६ बीएचपीची पॉवर आणि ४६० एनएम पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या इंजिनला ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडण्यात आले आहे. ही गाडी ६.२ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग पकडते.

या गाड्यांशी होणार स्पर्धा
नवीन Lexus RX हे मॉडेल BMW X5 Jeep Grand Cherokee, Range Rover Velar, Jaguar F-Pace आणि Audi Q7 सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.

काय असणार किंमत ?
नवीन Lexus RX दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. RX 350h Panasonic आणि RX 500h असे ते दोन मॉडेल्स आहेत. ज्यामध्ये कंपनीने RX 350h Panasonic हे मॉडेल ९५.८० लाख रुपये या किंमतीत लॉन्च केले आहे. तर RX 500h या मॉडेलची एक्सशोरूम किंमत १.१८ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *