Horoscope Today दि २६ एप्रिल ; आज या राशीना दिवस धनलाभाचा ; पहा बारा राशींचं भविष्य.

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ एप्रिल ।

मेष:-
आज अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. मित्रांशी मतभेद संभवतात. काही गोष्टी अचानक घडतील. मानसिक ताणतणाव जाणवेल.

वृषभ:-
आज जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस शांततेत जाईल. घरात तुमचा दबदबा राहील. संपर्कातील लोकांची मदत मिळेल.

मिथुन:-
आज उगाच चीडचीड करू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. आत्मविश्वास सोडू नका. उष्णतेचा त्रास जाणवेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

कर्क:-
आज जुनी इच्छा पूर्ण होईल. कमिशनमधून फायदा होईल. कामात कल्पकता दाखवाल. व्यवहारात चोख राहाल. चांगला व्यावसायिक लाभ होईल.

सिंह:-
आज प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तीचे धोरण ठेवाल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. हातून चांगले लिखाण होईल. बौद्धिक छंद जोपासाल.

कन्या:-
आज बुद्धीला ताण द्यावा लागेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कफाचा त्रास जाणवेल. भावंडांना मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी.

तूळ:-
आज चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात. घरगुती वस्तू खरेदी कराल.

वृश्चिक:-
आज आपल्या मतावरच आग्रही राहाल. तुमचा दबदबा वाढेल. उत्तम कार्यकुशलता दाखवाल. हातातील अधिकार वापराल. मानापमानाला सामोरे जाल.

धनू:-
आज मानसिक त्रासाला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. जवळचा प्रवास सावधानतेने करावा. फार काळजी करत बसू नका. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात.

मकर:-
आज आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक दर्जा सुधारेल. तुमच्याकडील अधिकाराची जाणीव ठेवावी. बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. अनावश्यक खर्च टाळावा.

कुंभ:-
आज उगाच चीडचीड करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आध्यात्मिक बळ वाढवावे. कामात स्थैर्य येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मीन:-
आज चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदारी उचलाल. इतरांचे कौतुक कराल. कलेची आवड जोपासाल. मनाजोगी खरेदी केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *