Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Weather Update : पुढचे 5 दिवस महत्त्वाचे, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा - Maharashtra 24

Weather Update : पुढचे 5 दिवस महत्त्वाचे, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । राज्यात पुढील ५ दिवस उर्वरित ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता , राज्यात विदर्भात सोमवार, २४ एप्रिलपासून पुढील ५ दिवस म्हणजे शुक्रवार, २८ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मराठवाड्यात गुरुवार (दि.२७) व शुक्रवारी (दि.२८) गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आगामी ५ दिवस राज्यात किमान तापमान ४ अंशाने, तर कमाल तापमान २ अंशाने सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. दरम्यान, रविवारी छत्रपती संभाजीनगरात दुपारी ढगाळ वातावरण होते. पाराही ३६.२ अंश सेल्सियसवर उतरला होता. जळगावला रविवारी सर्वाधिक ३९ अंश तापमान नोंंदवले गेले. नाशकात पारा ३४.८ वर होता.

राज्यातील निवडक शहरांतील तापमान

जळगाव ३९.०, अकोला : ३८.३, चंद्रपूर : ३८.२, सोलापूर : ३८.०, अमरावती : ३७.०, वर्धा : ३७.०, बीड ३७.०, सांगली : ३६.७, यवतमाळ : ३६.५, परभणी : ३६.४, बुलडाणा : ३६.२, छत्रपती संभाजीनगर : ३६.२, पुणे : ३६.१, नागपूर : ३५.३, नाशिक : ३४.८.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *