Sharad Pawar: शरद पवारांच मोठं विधान ; मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच सांगू शकत नाही

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या कामगिनेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते. असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवारांनी टाकलेली गुगली सर्वांना संभ्रमात पाडत आहे. (Sharad Pawar big statement Mahavikas Aghadi contest Lok Sabha elections together)


एकिकडे गेल्या काही दिवसांपासून विरोधा पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जात नविन सत्ता स्थापन करणार चर्चा रंगली आहे. अजित पवारांनी ही चर्चा फटकारली आहे. मात्र, चर्चा अद्याप सुरु आहे. इतकचं नव्हे तर अदानी ग्रुपची पाठराखण केल्यानंतर शरद पवार एनडीएत सहभागी होणार अशा चर्चेने जोर धरला होता.

दरम्यान, अमरावतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांना 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर पवार यांनी मोठं वक्तव्य केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *