महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० एप्रिल । महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांसाठी आयएमडीकडून हवामानाचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. (maharashtra weather update IMD five days rain Vidarbha )
मे महिन्याच्या सुरुवातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात पूर आल्याची परिस्थिती देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी दिसली. त्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे.
आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी गंभीर इशारा दिला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.
29/04: महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांसाठी IMD कडून हवामानाचा गंभीर इशारा. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस. केशरी रंगाचा इशारा दर्शविलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. pic.twitter.com/r4OCAjM1Kh
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 29, 2023
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. ३० एप्रिल तसेच १, २ व ३ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. ३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडणार आहे.
तर विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १, २ व ३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भात १ मे रोजी गारपीट तर २ आणि ३ मे रोजी पाऊस पडणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.