महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ मे । आज ३०० पेक्षा जास्त ‘आपला दवाखाना’ सुरू होताहेत. यामध्ये ३० टेस्ट मोफत दिले जाणार आहेत. आज मुंबईमधून मुख्यमंत्री शिंदे उद्धाटन करतील. मी नागुपरातून उपस्थित असेन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विकसित महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
फडणवीस म्हणाले, आज मी गडचिरोलीला जाणार आहे. ही समाधानाची बाब आहे आमच्या जवानांनी प्रचंड शौर्य दाखवलं आहे. सैन्याच्या शौर्यामुळे तेथे कायद्याचं राज्य निर्माण झालं आहे. मी दक्षिण आणि उत्तर गडचिरोलीत जाणार असून मुक्काम करणार आहे.