महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – गेल्या काही दिवसांपासून मलकापूर व नांदुरा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहे याचा आढावा घेतला.यावेळी मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित, उपविभागीय अधिकारी सुरेश विंचनकर, तहसीलदार, बीडीओसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची नोंदणी कशाप्रकारे करण्यात येते, ते आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते का, गावात फवारणी योग्यप्रकारे करण्यात येते का याची संपूर्ण माहिती घेऊन प्रशासनाने जास्तीत जास्त सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्याठिकाणी प्रत्यक्ष रुग्णालयाची पाहणी करून डॉक्टरर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना काही अडचणी आहेत का याची देखील चौकशी केली. औषधी, पीपीई किट्स, मास्क याची कमतरता असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मागणी करावी त्यांना ह्या सर्व गोष्टी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन यावेळी दिले.