‘नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना……. पवारांचा पुन्हा गौप्यस्फोट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ मे । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन आज २ मे रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या आत्मचरित्रातून मोठे दावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. २०१९ मध्ये शहरी भागात शिवसेनेची ताकद कमी करून स्वबळ मिळवायचं हाच भाजपचा हिशेब होता असा दावा शरद पवार यांनी केला. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत देखील मोठा गौप्यस्फोट केल्याचे समोर आले आहे.

या पुस्तकातून शरद पवार म्हणाले, ‘नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्राशी चांगला संवाद नव्हता, मात्र लोकांना फटका बसू नये म्हणून मी त्यांच्याशी संवाद साधत होतो. तत्कालीन गुजरात सरकार-केंद्रामध्ये मी संवादकाची भूमिका बजावली. काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी मोदींच्या मनात कमालीचा तिटकारा होता. काँग्रेस नेते मोदींपासून फटकून होते. २०१४ चं सत्ता परिवर्तन एकाएकी झालेली घटना नाही. यूपीए सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घायाळ होतं. तर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही असा प्रचार देशभरात करण्यात आला. ‘ असे शरद पवार म्हणाले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *