Maharashtra Shahir : ‘महाराष्ट्र शाहीर’ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ मे । ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. रिलीजच्या सहा दिवसांत या मराठी सिनेमाने 3.33 कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी (Maharashtra Day 2023) या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या मराठी सिनेमाने 0.3 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या सिनेमाने 0.55 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 0.8 कोटी कमावले. चौथ्या दिवशी अर्थात ‘महाराष्ट्र दिना’च्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या सिनेमाने एका दिवसात 1.03 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी 0.34 कोटी आणि सहाव्या दिवशी 0.31 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत रिलीजच्या सहा दिवसांत या सिनेमाने 3.33 कोटींचा गल्ला जमवला आहे.

शाहीर साबळे (Shahir Sable) यांचा नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदेने (Kedar Shinde) ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरीने (Ankush Choudhary) शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेने (Sana Shinde) या सिनेमात शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. अजय-अतुल यांनी या सिनेमातील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *