Gold Price Today: सोन्या, चांदीची उसळी; जाणून घ्या आज किती महाग मिळेल सोनं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ मे । आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत अलीकडच्या काळातील सतत चढउतार होत असतात, त्यामुळे भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या किमतीत वाढीसह व्यवहार होत आहे. बुधवारच्या व्यवहारात सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच वाढ दिसून येत असून आज सकाळच्या व्यवहारात दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

सोन्या-चांदीचा आजचा भाव
फेडरल रिझर्व्हच्या दराबाबत निर्णयापूर्वी चलनविषयक धोरणाबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ६० हजार रुपयांच्या वर हिरव्या रंगात व्यवहार करत आहे. म्हणजे आज खरेदीवर ग्राहकांना जास्त खिसा रिकामा करावा लागत आहे. आज सकाळच्या सत्रात किमतीत वाढीसह सोने ६०,५०० रुपयांच्या वर पोहोचले असून चांदीचा दरही ७६ हजार रुपयांच्या वर गेला आहे.

तेजीच्या काळात सोन्याचा दर १३० रुपये वाढीसह २४ कॅरेट सोन्याचा नवीन भाव सकाळी ९.१५ च्या सुमारास ६०,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होता. तर चांदीच्या दरातही मजबूतीसह व्यवहार होत असून दर प्रति किलो १५० रुपयांनी वाढून आज ७६,१४० रुपयांवर पोहोचला आहे. याआधी मंगळवारीही सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर ०.२१% वाढीसह ६०,५७० रुपयांवर तर चांदीचा भावही ०.२०% वाढून ७५,९९० रुपयांवर क्लोज झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *