महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ मे । आंबा हा फळांचा राजा आहे. यामुळे आंब्याच्या सिझनमध्ये लोक मोठ्याप्रमाणात खातात. दरम्यान आंब्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने आंबा खाणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. सध्या बाजारात दिसणारे आंबे आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती आहे. कमी आयातीमुळे किरकोळ बाजारात त्याची किंमत 70 ते 80 रुपये प्रतिकिलो आहे.
सध्या बाजारात 45 प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. मे महिन्यात आवक वाढणार असल्याने सर्व प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आंब्याची चव, आकार आणि रंग वेगवेगळा असतात.यामध्ये कॅम्पियरगंज, बलरामपूर, बाराबंकी, रुदौलीचा दसरी, लंगडा गवरजीत आदी आंब्यांच्या जाती उपलब्ध आहेत. सध्या बाजारात मिळणारे आंबे केमिकलने पिकल्याचे दिसून येत आहेत. हे आरोग्यासाठी अपायकारक आहे, त्यामुळे लोकांनी सध्या आंबा खाणे टाळावे असे आवाहन तज्ञांकडून देण्यात आलं आहे.
आंबा कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. हे खूप हानिकारक आहे. त्यावर बंदी आहे, पण तरीही व्यापारी झटपट नफा कमावण्यासाठी त्याचा वापर होतो.म्हणूनच लोकांनी आंबा खाणे टाळावे जेणेकरून त्यांचे आरोग्य बिघडू नये. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याची चवही वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.