Gold Silver Price: सोन्याच्या दरात 900 रुपयांची विक्रमी वाढ ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ मे । Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 880 रुपयांनी तर चांदीचा भाव एक किलो मागे 700 रुपयांनी वाढला आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,500 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,640 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 761 रूपये आहे. (Gold Silver Price update 4 May 2023)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

पुणे – 61,640 रुपये

मुंबई – 61,640 रुपये

नागपूर – 61,640 रुपये

चेन्नई – 62,240 रुपये

दिल्ली – 61,790 रुपये

हैदराबाद – 61,640 रुपये

कोलकत्ता – 61,640 रुपये

लखनऊ – 61,790 रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *