Political News: अजित पवार मुख्यमंत्री होणार ; असिम सरोदेंचा मोठा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ मे । राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सध्या एकाचवेळी सुरु आहेत. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याच्या कारणात अनेक मोठे बदल होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्व चर्चांदरम्यान वकील असिम सरोदे यांच्या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 11 मे अजित पवार येत्या काळात भाजपसोबत जातील आणि मुख्यमंत्री बनतील असा दावा, असिम सरोदे यांनी केला आहे.

11 मे नंतर राजकीय घडामोडींना वेग येणार
असिम सरोदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे आधी नक्की होतील. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की आहे.’


राज्यात नवीन राजकीय जुळवा जुळव सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय जबाबदारी सुप्रिया सुळे तर राज्यातली जबाबदारी अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, असं मत असिम सरोदे यांनी मांडलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या निकालाच्या आधारे राज्यातील राजकारण बदलेल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचे काही आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकार पडू शकतं. अशावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याच संधी आहे.

शिवसेनेचे आमदार अपात्र झाले तर…
अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शरद पवार यांची अडचण होणार म्हणून ते बाजूला गेले आहेत. शिवसेनेचे आमदार अपात्र झाले तर अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल. ते महाविकास आघाडीसोबत किंवा भाजप सोबत जाऊन सुद्धा सरकार स्थापन करू शकतात, असा दावा असिम सरोदे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *