चारधाम यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, हजारो भाविक रस्त्यात अडकले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ मे । बद्रीनाथ, केदारनाथ मंदिराची कवाडं उघडल्यानंतर भाविकांनी दर्शन घेऊन आपली चारधाम यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत सर्वात मोठा अडथळा बदलत हवामान ठरत आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ इथे सतत हवामान बदलत आहे. त्यामुळे भाविकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे चारधाम यात्रेदरम्यान एक मोठा अनर्थ होता होता टळला आहे.

बद्रीनाथ महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या हेलांगजवळ डोंगराला तडा गेला. त्यामुळे दरड कोसळली आहे. काही सेकंदाच्या फरकाने भाविकांचा जीव वाचला आहे. या मार्गावरून भाविक जात असताना ही मोठी घटना घडली. दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला असून भाविक अडकले आहेत. दरड हटवण्याचं काम सुरू आहे.

मोचा चक्रीवादळाचा धोका, कसं ठरवलं जातं चक्रीवादळाचं नाव?

बद्रीनाथ महामार्गावरील हेलांग येथील डोंगरावरून दरड कोसळल्यानं रस्ता बंद करण्यात आला आहे. यानंतर प्रशासनाने बद्रीनाथ यात्रा थांबवली आहे. दरड कोसळताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना पोलिसांनी खबरदारी म्हणून भाविकांना जिथे आहात तिथेच थांबण्याचे आणि पुढचा प्रवास तूर्तास थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *