Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
World Cup 2023 मधील भारत-पाक सामन्याबद्दल मोठी Update - Maharashtra 24

World Cup 2023 मधील भारत-पाक सामन्याबद्दल मोठी Update

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ मे । आयपीएलची धूम संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ WTC च्या तयारीला लागेल, तर काही खेळाडू भविष्यातील स्पर्धांसाठी तयारी करताना दिसतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला भारतीय संघाची एकंदर कामगिरी पाहता संघानं 2023 मधील विश्वचषकावर नाव कोरावं अशीच क्रिकेटप्रेमींचीही अपेक्षा आहे. किंबहुना भारतीय संघाला सर्वतोपरी पाठींबा देण्यासाठी आता बीसीसीआयसुद्धा प्रयत्न करताना दिसत आहे. मग तो क्रिकेटप्रेमींच्या पाठिंब्याच्या रुपात का असेना.

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी Update
सध्याच्या घडीला संपूर्ण विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेटप्रेमींचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेमका कुठे खेळवला जाणार? तर, तणावाची परिस्थिती पाहता हे सामने पाकिस्तानात होणार नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालं. ज्यानंतर गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोची स्टेडियमनं India vs Pakistan सामन्याचं आयोजन करणासाठी इच्छुकांच्या यादीत बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या इथंची चित्र स्पष्ट झालं असून, आता याच स्टेडियममध्ये भारत-पाक सामना खेळवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *