Gold Price in Pune : पुणेकरांना गुड न्यूज, पाहा आज कितीनं स्वस्त झालं सोनं?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ मे । भारतीयांना सोनं खरेदीचं मोठं आकर्षण आहे. वाढदिवस, सण किंवा घरातील मंगल प्रसंगी सोन्याची खरेदी केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे.पुणे शहरातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दुकानांमध्ये दागिन्यांचे निरनिराळे ऑप्शन मिळतात. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

पुण्यात काल (5 मे) 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 63367 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 58086 रुपये प्रती तोळा इतका होता.पुण्यात आज (6 मे) 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 62566 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,352 रुपये प्रती तोळा इतका आहे. शुक्रवारपेक्षा पुण्यातील सोनं आज स्वस्त झालं आहे.

आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6256 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5735 इतकी आहे.पुण्यातील चांदीची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. येथे आजचा चांदीचा दर 76000 रुपये प्रती किलो आहे.पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *