महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मे । शिवभक्त भगवान भोलेनाथांच्या आवडत्या श्रावन महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. 2023 सालचा श्रावण महिना खास असणार आहे, कारण यावेळी एक नाही तर श्रावणाचे दोन महिने आहेत. श्रावण महिना 30 नसून 59 दिवसांचा असेल आणि या श्रावण महिन्यात 8 श्रावण सोमवार असतील. वास्तविक, नवीन विक्रम संवत 2080 मध्ये 12 ऐवजी 13 महिने पडत आहेत. यावेळी अधिकामास किंवा मलामास पडत आहे. हिंदू पंचांगमध्ये प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अतिरिक्त असतो, म्हणून त्याला अधिकमास म्हणतात.
…म्हणून एक महिना वाढतो
वैदिक पंचांगात सूर्य आणि चंद्राच्या आधारे गणना केली जाते. चंद्र महिना 354 दिवसांचा आणि सौर महिना 365 दिवसांचा असतो. यामुळे दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो, जो 3 वर्षांत 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस समायोजित करण्यासाठी, दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त महिना असतो आणि त्याला मलमास म्हणतात. त्याला पुरुषोत्तम महिना असेही म्हणतात.
2023 मध्ये, मराठी श्रावण महिना 18 जुलै 203 पासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबर 2023 पर्यंत असेल. अशा प्रकारे, यावेळी श्रावण 59 दिवसांचा असेल. या दोन श्रावण महिन्यांची विभागणी अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी केली जाते. अधिक श्रावण महिना 18 जुलै पासून सुरू होईल आणि 17 ऑगस्टपासून निज श्रावण महिना सुरू होईल तो 15 सप्टेंबरला संपेल. अधिक आणि निज असे दोन श्रावण महिने असल्याने यंदा 8 श्रावण सोमवार असतील. त्यामुळे शंकराचा श्रावण सोमवार उपवास करणाऱ्यांना 8 सोमवार व्रत-उपवास करावे लागतील.
अधिक महिन्यामुळे यंदा श्रावणानंतरचे सर्व सणही नेहमीपेक्षा काही दिवस उशिराने होतील. उदाहरणार्थ, रक्षाबंधन 30 ऑगस्टला असेल, ते सहसा 10 ते 15 ऑगस्टच्या आसपास असते. श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगाचा जलाभिषेक केल्यानं भगवान शिवाचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात. भक्तांच्या सर्व मनोकामना भोलेनाथ पूर्ण करतात, असे मानले जाते.
चातुर्मास 5 महिन्यांचा असेल
चातुर्मासही अधिकमासामुळे प्रभावित होणार असून चातुर्मास 4 महिन्यांऐवजी 5 महिन्यांचा असेल.म्हणजे देवशयनी एकादशीला चातुर्मास 29 जून 2023 पासून सुरू होईल आणि 23 नोव्हेंबरपर्यंत राहील. म्हणजेच लग्न, गृहप्रवेश अशा शुभ कामांसाठी लोकांना जूननंतर बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.