महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. (Maharashtra Poltical Crisis ED notice to Jayant Patil Order to stay the inquiry)
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. अशातच जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता. जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे.यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे.