महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । पंजाब राज्याच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरमधील जवळ तिसऱ्यांदा बॉम्बस्फोट झाला आहे. अलिकडच्या तीन दिवसातील हा तिसरा बॉंम्बस्फोट आहे. या बॉंम्बस्फोटमुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. माहितीनुसार बुधवारी (दि.१) मध्यरात्रीनंतर स्फोट झाल्याचा आवाज आला. हा आवाज खूप लांबपर्यंत येत होता. आवाजामुळे नागरिक घाबरून बाहेर आले. हा बॉंम्बस्फोट पहिल्या स्फोटाच्या ठिकाणापासून मोठ्या अंतरावर आहे. दरम्यान बॉम्बस्फोट प्रकरणात 5 सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.
पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, अमृतसर बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या पाच सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे. शांतता भंग करण्याचा या स्फोटामागील हेतू होता. स्फोटात फटाक्यांमध्ये वापरण्यात आलेली स्फोटके वापरण्यात आली होती. पोलिस लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली.
Five conspirators who allegedly planned the Amritsar blast have been nabbed. The motive behind the blast was to disturb peace. Explosives used in firecrackers were applied in the blast. Police to hold a press conference shortly: Punjab police sources pic.twitter.com/FoY7cU4RRj
— ANI (@ANI) May 11, 2023