महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । राज्यात आज अनेक जिह्यांत तापमान चाळिशी पार गेले असून उन्हाचा कडाका अधिक तीव्र झाला आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात आज बहुतेक जिह्यांतील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. विदर्भातील अनेक जिह्यांतील तापमान चाळिशीपार होते. जळगावमध्ये सर्वांधिक 44.8 तापमान नोंदवले गेले. त्याखालोखाल अकोला आणि वर्ध्यात 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोलापूर 41.5, कोल्हापूर 37.1, बारामती 40, नाशिक 40.7, महाबळेश्वर 33.5, अलिबाग 36, सातारा 39.3, छत्रपती संभाजीनगर 41.4, सांगली 38.5, उदगीर 38.3, ठाणे 39.9, पुणे 41, रत्नागिरी 34.8, सांताक्रुझ 36.9, नांदेड 42.8, धाराशीव 40.6, जालना 42.8, बीड 41.9 अशी नोंद झाली.