CBSE Results 2023: सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर; कुठे पाहाल निकाल? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावी परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी लागलेल्या निकालानुसार बारावीच्या परीक्षांमध्ये 87.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदाच्या वर्षी CBSEची मेरीट लिस्ट नाही ही बाब विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यावी.

घरसबसल्या किंवा आहात त्या ठिकाणाहून कसा पाहाल निकाल?
– निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
– तिथं होमपेजवर CBSE Board Class 12th Result 2023 या लिंकवर क्लिक करावं.
– आता विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक तिथे टाकावा.
– क्रमांक देताच पुढच्या क्षणाला तुमच्यासमोर निकाल दिसेल.
– आता हा निकाल पाहून तुम्ही तो डाऊनलोड करा.

यंदाच्या वर्षी तब्बल 16,60,511 विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14,50,174 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहता 87.33 टक्के विद्यार्थ्यांनी हा शैक्षणिक टप्पा ओलांडला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *