Wrestler Protest: अखेर दिल्ली पोलिसांसमोर बृजभूषण सिंह हजर, जबाब नोंदवला आरोप मात्र फेटाळले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । भारतीय महिला कुस्तीपटूंनी (wrestlers) भाजपाचे आमदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sigh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह हे दिल्ली पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांनी पोलिसांकडे त्यांचा जबाब नोंदवला असून त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडे काही कागदपत्र देखील मागितली आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा गरज पडल्यास त्यांना पोलिसांत हजर रहावे लागणार आहे.


एसआयटी समोर नोंदवला जबाब
बृजभूषण शरण सिंह यांनी दिल्ली पोलिसांच्या एसआयटी पथकासमोर त्यांचा जबाब नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी सहा सदस्यांची एसआयटी समित गठित केली आहे.

बृजभूषण यांच्याबरोबर भारतीय कुस्ती संघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. महिला कुस्तीपटूंनी विनोद तोमर यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत.

बृजभूषण यांच्यावर काय आरोप आहेत?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर 7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितांमध्ये एक अल्पवयीन मुलगी देखील आहे, ज्यांच्या प्रकरणी बृजभूषण यांच्या विरोधात बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृजभूषण शरण यांच्याविरोधात पोलीसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी कुस्तीपटूंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *