AC सुरू असताना सिलिंग फॅन लावला तर चालतो का? या गोष्टी लक्षात ठेवा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । काही जणांचं म्हणणं असतं की, एसी सुरू असताना सीलिंग फॅनचा उपयोग करू नये, कारण सीलिंग फॅनमधून गरम हवा निघते. मात्र जेव्हा एसीसोबत सीलिंग फॅन लावला तर हवा खोलीत खेळती राहते. यामुळे खोली लवकर थंड आणि आरामदायक होते.


सीलिंग फॅनमुळे खोलीच्या कोपऱ्याकोपऱ्यात थंड हवा पोहोचते. त्यामुळे एसीला अधिक काम करावं लागत नाही. मात्र खोली अधिक काळ थंड राहावी आणि खोलीतून थंड हवा बाहेर जाऊ नये यासाठी सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करायला हवीत. एसीसोबत पंख्याचा वापर केल्यामुळे वीजेची बचत केली जाऊ शकते. यासाठी एसीचं तापमान 24 ते 26 वर सेट केलं तर फायद्याचं ठरेल आणि पंखा कमी स्पीडवर ठेवावा. अशाने खोली लवकर थंड होते. पंख्याची हवा खोलीभर फिरते. यामुळे खोली लवकर थंड होते. शिवाय वीजही कमी लागते. एसी सर्वसाधारणपणे 6 तासांपर्यंत वापरावा. यातून 12 यूनिट खर्च येतो. मात्र एसीसह पंखा लावल्याने 6 युनिट इतका खर्च होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *