केस काळे, दाट आणि मजबूत करण्यासाठी.

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मे । आजच्या बदलत्या काळात, केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे.पण चुकीचा आहार, खराब जीवनशैली ही केस गळतीचे मुख्य कारणे सांगितली जातात. या समस्येवर वेळीच उपचार केले नाहीत,तर याचे परिणाम दूरगामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये केस गळती कमी होण्यासाठी,तसेच केस लांबसडक काळेभोर आणि चमकदार करण्यासाठी तेल सांगितले आहे. या तेलाच्या नियमित वापराने केस गळून टक्कल पडलेल्या भागावर नवीन केस येण्यासाठी मदत होते. हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी आपल्याला सर्व किचनमधील वस्तूची आवश्यकता लागणार आहे.त्यामुळे सर्व वस्तू आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होणार आहेत या उपायासाठी आपल्याला पाच वस्तू लागणार आहेत.

१) ३ चमचे खोबरेल

2) १ चमचा एरंडेल तेल. या तेलामुळे केस गळणे थांबते व केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. केस काळे होण्यास मदत होते. हे एरंड तेल केसांसाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे.

३) कांदा . कारण केस काळे करण्यासाठी कांद्याचा उपयोग बर्‍याच काळापासून केला जातो. तुमच्या घरात लाल किंवा पांढरा कांदा असा कोणताही कांदा वापरू शकता. कांद्यामुळे आपली केस गळती थांबते तसेच केस काळे करण्यासाठी मदत होते. या उपायासाठी कांदा हा बारीक वाटून एक चमचा वापरायचा आहे.

४) लसूण पाकळ्या. आपल्याला 3 ते 5 पाकळ्या घ्यायच्या आहेत.लसणामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असतं, त्याचप्रमाणे सेलेनियम नावाचा केसांना मदत करणारा किंवा केसांसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे केस गळणे थांबते किंवा दुतोंडी केस येणे बंद होते.

५) आवळा. आपल्याला ताजा आवळा मिळाल्यास,तो 2 चमचा वापरा किंवा दुकानात आवळा पावडर सहज उपलब्ध होते,ती आपल्याला फक्त अर्धा चमचा वापरायची आहे. आवल्यामध्ये व्हिटीमीन सी मोठ्या प्रमाणात असून, केस रेशमी काळे आणि चमकदार होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कोंडा कमी होतो.

हे मिश्रण आपल्याला गॅसवर मंद आचेवर पाच मिनिट ठेवून,त्यानंतर थंड करून वस्त्रगाळ करुन घ्यायचे आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी टक्कल तसेच केसांची मुळं, पूर्ण केस यांना हळूहळू मसाज करायचा आहे.

हा उपाय तुम्हाला किमान 15 दिवस करायचा आहे. त्यामुळे तुमचे केस लांब चमकदार आणि काळे होतील.तसेच हे मिश्रण सलग 2 महिने वापरलं तर, तुमच्या ज्या भागावर केस नाहीत, त्या भागावर नवीन केस येण्यास सुरुवात होईल. पुरुषांनी हे मिश्रण रोज संध्याकाळी लावले पाहिजे तर महिलांनी आठवड्यातून फक्त 2 वेळेस लावायचे आहे. हे मिश्रण रात्रभर ठेवून सकाळी धुवून टाकावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *