कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरला? अंतर्गत कलह टाळण्यासाठी काँग्रेसचा मास्टर प्लान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मे । कर्नाटकमध्ये काँग्रेसनं भाजपचा पराभव करत पूर्ण बहुमत प्राप्त केलं आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आता कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस मुख्यमंत्रिपदाबाबत सावध भूमिका घेताना दिसून येत आहे. काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संभाव्य मुख्यमंत्रिपदाच्या दावेदाराबाबत संकेत दिले आहेत. खर्गे यांनी दिलेल्या संकेतानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैया आणि काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना प्रत्येकी अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.


नेमकं काय म्हणाले खर्गे?

कर्नाटकमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूप वेळ दिला. मात्र आता कर्नाकटमधील जनतेनं काँग्रेसच्या हाती सत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सिद्धरमया आणि डी. के. शिवकुमार या दोन नेत्यांसोबत मिळून कार्नाटकचे सरकार बनवणार आहोत. या दोन नेत्यांवर मोठी जबाबदारी आहे. खर्गेंनी दिलेल्या संकेतानुसार माजी मुख्यमंत्री सिद्धरमया आणि डी. के. शिवकुमार या दोन नेत्यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *