महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मे । जागतिक बाजारात अमेरिकेतील घडामोडींचा मोठा परिणाम सोने-चांदी (Gold Silver Price), कच्चा इंधनाच्या किंमतींवरुन दिसून येत आहे. सोने-चांदीचा भाव वधारला आहे. सोन्याने पुन्हा गिरकी घेत ग्राहकांची फिरकी घेतली. गेल्या आठवड्यात भावात पडझड झाल्यानंतर भाव वधारले आहेत. चांदीने पण गेल्या आठवड्यातील कसर भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवार-रविवारी सुट्टी असल्याने इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनने भाव जाहीर केले नव्हते. पण बाजारात सोन्याने दरवाढीची वर्दी दिली होती. तर चांदीत घसरण कायम होती. सोमवारपासून घसरणीच्या सत्राला ब्रेक लागला.
काय होता भाव
गुडरिटर्न्सनुसार, सोमवारी 15 मे रोजी सोन्याच्या भावात मोठा बदल झाला नाही. 22 कॅरेटचा भाव 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज हा भाव अनुक्रमे 56,790 रुपये आणि 61,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज ibjarates सकाळच्या सत्रातील भाव जाहीर केलेला नाही. काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,208 रुपये तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 56,067 रुपये होते.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,208 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,963 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 56,067 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,906 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
चांदीचा दरवाढीचा गिअर पडणार
1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,100 रुपये होता. 10 मे रोजी सकाळच्या सत्रात चांदी किलोमागे 100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,000 रुपये झाला आहे. मंगळवारी 16 मे रोजी सकाळच्या सत्रात भावात मोठ दिसला नाही. एक किलो भाव 74,800 रुपये आहे. तर ibjarates.com नुसार, एक किलो चांदीचा 72,455 रुपये भाव आहे.