बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; हृदय राहील ठणठणीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ मे । जगभरात हार्ट अटॅकमुळे(Heart disease) अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. हृदयाशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी जवळपास १७.९ लोकांचा मृत्यू होतो. अशा स्थितीत हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. तुम्ही दिवसभरात जे काही खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावरही होतो. (How to control cholesterol) फॅट्सयुक्त पदार्थांच्या अतिसेवनानं कोलेस्टेरॉल वाढते.

कोलेस्टेरॉल असा पदार्थ आहे. (How to Lower cholesterol Level) जो रक्ताच्या नसांना ब्लॉक करून शरीरातील ब्लड ब्लड फ्लो थांबवतो. यामुळे स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. योगगुरू बाबा रामदेव यांनी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. कोलेस्टेरॉल वाढल्यानं रक्ताच्या गुठळ्या होऊन नसांमध्ये रक्त जमा होतं. अनेकदा ब्लड वेसल्समध्ये ब्लॉकेजमुळे मेंदूपर्यंत पोहोचल्यानं हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. याशिवाय रोज एक ग्लास बीटरूटचा रस प्यायल्याने रक्तवाहिन्यांमधील जळजळ होण्याची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते. अंगाची रक्त वाढून कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

५ फळं आणि भाज्या रोज खा, कॅल्शियमचा खजाना-म्हातारपणातही शरीरातील सगळी हाडं राहतील ठणठणीत

रिसर्चनुसार हाय कोलेस्टेरॉल असलेल्या इतर रुग्णांच्या तुलनेत कोरोना इंफेक्शनंतर हार्ट अटॅकचे चान्सेस २० टक्क्यांनी वाढले आहेत. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अनुवांशिकता, जास्त दारू पिणं, ताण-तणाव, वर्कआऊट न करणं, जास्त प्रमाणत मीठाचे सेवन या गोष्टी कोलेस्टेरॉल वाढण्यास कारणीभूत ठरतात.

बाबा रामदेव यांच्यामते सूर्यनमस्कार, ताडासन, मांडूकासन, पश्चिमोत्तनासन, गोमुखासन, हलासना, योग मुद्रा, पायाची मुद्रा, जॉगिंग या योगासनांनी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवता येतं. ताडासनामुळे रक्ताभिसारण योग्य पद्धतीनं होतं, गुडघे मजबूत होतात, थकवा-ताणतणाव दूर होतो. सुर्यनमस्कारानं शरीराला उर्जा मिळते. एनर्जी लेव्हल वाढते, शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढून पचनतंत्रही सुधारते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *