Maharashtra SSC Result 2023: निकालात गडबड किंवा मनासारखे मार्क्स मिळाले नाहीत? मग पेपर्स असे द्या रिचेकिंगला; ही घ्या संपूर्ण प्रोसेस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जून । अखेर आज म्हणजेच 02 जूनला 2023 ला स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra state board 10th Result 2023) जाहीर झाला आहे. यंदा निकाल कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे.आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन जाहीर झाला आहे. पण या निकालात तुम्हाला काहीही त्रुटी आढळल्या किंवा मनासारखे मार्क्स मिळाले मिळाले नाहीत तर चिंता करू नका. तुम्ही तुमचे पेपर्स रिचेकिंगला देऊ शकता. याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अशी असेल रिचेकिंग प्रोसेस

पेपर रिचेकिंगला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आधी ऑफिशिअल या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे.

यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत.

यानंतर विवद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला जाणार आहेत.

यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळणार आहेत.

यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *