महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जून । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,५२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,२४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७२,०७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,८६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,५६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,५२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५६० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५२० रुपये आहे.